डॉ. रेड्डी खूनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी जेरबंद

एलसीबी सिंधुदुर्ग ची दमदार कामगिरी ; आरोपीला घेऊन एलसीबीचे पथक कणकवलीत दाखल

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय 20, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिख बल्लापूर, राज्य कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने त्याच्या राहत्या घराजवळून कर्नाटक राज्यामधून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, अंमलदार अमर कांडर, पोलीस मुख्यालयातील चालक अंमलदार विक्रम पवार, अंमलदार मलकारसिद्द जमादार यांच्या पथकाने 5 नोव्हेंबर रोजी ही दमदार कामगिरी फत्ते केली.

6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता एलसीबी च्या पथकाने आरोपी वर्धन के. एन. याला घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपी वर्धन याला कणकवली पोलिसांच्या हवाली केले. 23 ऑक्टोबर रोजी कणकवली तालुक्यातील साळीस्ते गणपती साना येथे अज्ञात पुरुषाचा धारदार शस्त्राने भोसकलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. हा मृतदेह बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान बंगळूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात एलसीबी ने पकडलेल्या आरोपींची एकूण संख्या 5 झाली असून अद्याप 4 आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. 25 ऑक्टोबर पासून मागील 15 दिवस एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथक बेंगळुर मध्ये डॉ. रेड्डी यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी ठाण मांडून होते. अत्यंत हायप्रोफाईल असलेल्या डॉ. रेड्डी मर्डर मिस्ट्री सोडविण्यात एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाला यश आले असून उर्वरित चार आरोपीनाही लवकरच गजाआड केले जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!