कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बेर्ले गावात आयुष्यमान भारत कार्डचे काम १०० टक्के पूर्ण

सरपंच संतोष ब्रम्हदंडे यांनी मानले आरोग्य विभागाचे आभार

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या आयुष्यमान भारत अर्थात वय वंदना कार्ड योजनेत कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बेर्ले या गावात या योजनेचे १००% काम पूर्ण झाले असून या यशस्वी उपक्रमाबद्दल कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांनी आरोग्य विभागाचे विशेष आभार मानून कौतुक केले आहे. यावेळी सरपंच संतोष ब्रम्हदंडे, उपसरपंच बाबाला गोसावी, ग्रा.पं.सदस्य बबलू पवार, विशाखा राऊत, रवींद्र पवार, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर, अक्षदा सादीकले, ग्रामपंचायत अधिकारी गिरीश धुमाळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर सचिन कदम, शिपाई राजेंद्र लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुष्यमान भारत कार्ड अर्थात वय वंदना हा शासनाचा १०० टक्के उपक्रम राबवून गावाला अवॉर्ड मिळावा हा उद्देश नसून तर गावातील नागरिकांना शासनाच्या विविध शासकीय सेवा योजनाचा लाभ मिळावा असा प्रामाणिक उद्देश असल्याचे यावेळी कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांनी सांगितले. आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे १०० टक्के काम पूर्ण करण्यासाठी खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वतीने व स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष शिबिर राबविण्यात आले होते. याकरिता कुरंगवणे व बेर्ले या गावातील सर्व नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. तर आरोग्य विभागाच्या वतीने घर टू घर मोहीम राबवून वय वंदना कार्डचे गावात १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले. याकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरणे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांचे विशेष सहकार्य लाभले. तर आरोग्य सहायक पी. एस. भागवत, के. एस. वानोळे, आरोग्य सहायिका यू. एस. काटकर, आरोग्य सेवक आर. जी. नायकोजी, आरोग्य सेविका श्रीम.दुखंडे, आरोग्य समुदाय अधिकारी ऋषिकेश माने, सी. एच. जाधव, आशा स्वयंसेविका योजना गतप्रवर्तक संकिता संतोष पाटणकर, आशा स्वयंसेविका वैष्णवी पवार, अंगणवाडी सेविका अंजली राऊत, गौरी पवार, रुपाली कुडाळकर, शुभ्रा राऊत आदी कर्मचाऱ्यांनी हे शिबिर १०० टक्के यशस्वी राबविण्यासाठी मेहनत घेतली.

error: Content is protected !!