रामकृष्ण वासुदेवा | जागवी जनासी | टाळ मृदंग घोष | अभंग काकडा

फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील काकड आरतीचा यशस्वी समारोप

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण-गणेश मंदिरात, प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, रोज पहाटे काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. पेठेतील हा खेळिया या बालगोपाळांचे तथा ग्रामस्थांचे आराध्य असल्याने, रोज पहाटे पाच वाजता काकड आरती नित्यनेमाने सुरू होत होती. जुन्या जाणत्यांसह युवाई आणि शालेय मुलामुलींची उपस्थिती भविष्याकरता आशादायी ठरली.

जनतेला सळो की पळो करून सोडणाऱ्या,महाक्रुर तारकासुराचा वध, भगवान शंकराचा पराक्रमी पुत्र कार्तिक स्वामींनी केला. त्याचे पुण्यस्मरण म्हणून काकड आरतीची प्रथा रूढ झाली. स्थापनेपासून मंदिरामध्ये ही आरतीची प्रथा आणि परंपरेने सुरू आहे. त्यामुळे गेला महिनाभर पाऊस, धूके, थंडी अशा बदलत्या वातावरणात बालगोपाळ आणि अबालवृद्धा च्या उपस्थितीत काकड आरती उत्साहाने पार पडते आहे.

देवेंद्र चोरगे यांचे मृदुंग वादन आणि बालगोपाळांच्या खड्या आवाजातील आरत्या पहाटेचे वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायी करतात. त्यामुळे पेठेची सकाळ पवित्र्यमय, चैतन्यमय होते. आज द्वादशी दिवशी काकडा आरतीचा उदंड उत्साहात समारोप करण्यात आला. आणि यावेळी भजन,अभंग आरती, गजर — गोपाला गोपालाs देवकीनंदन गोपाला ss ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जयss अशा जयघोषात पसायदान, प्रार्थना समारोप करण्यात आला. दुपारी समराधना होऊन महाप्रसादाचा लाभ अबालवृद्धांसह युवा आणि बालगोपाळांनी घेतला.

error: Content is protected !!