संजय गांधी निराधार समिती सदस्यपदाच्या माध्यमातून गरजू ना लाभ मिळवून द्यावा
वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांचे चिरंजीव, युवा उद्योजक सिद्धेश रावराणे यांची वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी निवड करण्यात आल्याबद्दल सिद्धेश यांचा आचिर्णे मधलीवाडी रावराणे कुटुंबीय कार्यकारिणी मंडळाच्या वतीने मुंबई येथे सत्कार करत पुढील राजकिय कारकिर्दीला शुभेच्छा देण्यात आल्या. संजय गांधी निराधार समिती सदस्यपदाच्या माध्यमातून लोरे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विभागातील गरजूना संजय गांधी निराधार पेन्शन मिळवून देण्यासाठी सिद्धेश नक्कीच पुढाकार घेतील. गरजू आर्थिक दुर्बलाना शासनाच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ मिळवून त्यांना आर्थिक आधार देतील अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त करत सिद्धेश यांच्या पाठीवर कौतुकाची शाल पांघरली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सदाशिव केशव रावराणे, सचिव अतुल अनंत रावराणे, खजिनदार नागेश रवींद्रनाथ रावराणे यांच्यासह भूषण सुनील रावराणे, राकेश रणजीत रावराणे, विकास केशव रावराणे, प्रभानंद शंकर रावराणे, श्रीकांत रावजी रावराणे, नितिन आत्माराम रावराणे, नारायण लऊ धुळप, महेश प्रकाश रावराणे, पंडित अनंत रावराणे, अरविंद सुभान रावराणे, स्वानंद सुभाष रावराणे, अनिमेश तुकाराम रावराणे, यशवंत आप्पाजी रावराणे, विजय बाळकृष्ण रावराणे, सुभाष आप्पाजी रावराणे, आदेश प्रकाश रावराणे, रामचंद्र रमाकांत रावराणे (राजा), मंदार दशरथ रावराणे, अविनाश रविकांत रावराणे, अजय भगवान रावराणे
रोहित रवींद्र रावराणे, रुपेश गणपत रावराणे, देविदास रमेश रावराणे, प्रतीक पांडुरंग रावराणे, सुनील सुभान रावराणे, सचिन शिवाजी रावराणे, अभिजीत भिकाजी रावराणे, चिनार मोहन रावराणे, तन्मय श्रीकांत रावराणे, स्वप्नील शिवाजी रावराणे, रोहन रवींद्र रावराणे, अवधूत श्रीकांत रावराणे, अनिल सुभान रावराणे, विजयसिंह अनंत रावराणे, सत्यवान अनंत रावराणे आदी उपस्थित होते.













