संजय आंग्रेंसह शिवसेना पदाधिकारी पालकमंत्री नितेश राणेंच्या भेटीला

ओम गणेश बंगल्यावर भेट घेत कणकवली नगरपंचायत युतीचा दिला प्रस्ताव 

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणूकीबाबत भाजपा – शिंदे शिवसेना युतीबाबत महत्वाच्या घडामोडी सुरू असून बुधवारी रात्री शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपासोबत शिंदे शिवसेना युतीबाबत ह्या भेटीत अत्यंत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. नगरपंचायत निवडणूक युतीबाबत शिवसेनेकडून भाजपाला प्रस्ताव दिला गेल्याची माहिती मिळत आहे. भाजपा जिल्हा कार्यालयात शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांची आजच सायंकाळी भेट घेत युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर काही तासांतच शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी ओम गणेश बंगल्यावर मंत्री नीतेश राणेंच्या घेतलेल्या भेटीने कणकवली शहरात भाजपा शिंदे शिवसेना युती होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या शहर विकास आघाडीचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दामू सावंत, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, सुनील पारकर बाळू पारकर उपस्थित होते.

error: Content is protected !!