फोंडाघाटचे कष्टाळू जेष्ठ शेतकरी सदाशिव बाणे यांचे दुःखद निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट (झरयेवाडी) येथील प्रथितयश शेतकरी सदाशिव बाळू बाणे (85 वर्षे) यांचे राहत्या घरी, वृद्धापकाळातील आजारपणामध्ये दुःखद निधन झाले. एकेकाळी फोंडाघाट सारख्या ऐतिहासिक उतारपेठे मधील कोरगावकर यांच्या नामवंत पिढीवर अभ्यासु दिवाणजी म्हणून यांनी काम केले. सोबत आपल्या शेतावर विविध भाजीपाला, फळे, कंदमुळे यांच्यावर संशोधनात्मक शेती करून, आपली कृषीतज्ञ म्हणून ओळख निर्माण केली होती. तरुणांनी शेतीमध्ये करिअर करावे असा त्यांचा आग्रह असे. आपल्या मुलांना त्यांनी शेतीची आवड व गोडी लावली आणि यशस्वी शेतकरी केले. कष्टाळू, स्पष्ट वक्ते, खडा आवाज म्हणून ते सुपरिचित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पेठेतील भाजी फळे विक्रेते विनायक यांचे ते पिताश्री होत.त्यांच्या निधनामुळे वाडी- पेठेत दुःख व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!