आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील रामगड येथील रहिवासी आणि प्रतिष्ठित नागरिक असलेले चंद्रकांत शिवराम बांदिवडेकर (वय ८५) यांचे नुकतेच राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. चंद्रकांत बांदिवडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून रामगड ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या आपल्या कुटुंबीयांसमवेत निवासस्थानी राहत होते. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. अतिशय शांत स्वभावाचे आणि सर्वांमध्ये आपुलकीने सहभागी होत असत. रामगड येथील रिक्षा व्यावसायिक आण्णा आणि संदीप बांदिवडेकर यांचे ते वडील होत. तसेच तळेरे येथील पत्रकार संजय खानविलकर यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रामगड येथील जेष्ठ नागरिक चंद्रकांत शिवराम बांदिवडेकर यांचे निधन












