“आभाळमाया ग्रुपचे काम सामाजिक संदेश देणारे” – कोकणी रान माणूस, प्रसाद गावडे

आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिरात तब्बल २७३ जणांनी केले रक्तदान

चौके (प्रतिनिधी) : ” सलग पाच वर्षे विक्रमी रक्तदान शिबिर घेणाऱ्या आभाळमाया ग्रुपचे काम हे चांगला सामाजिक संदेश देणारे असे आहे. देशात जात धर्म यावरून धार्मिक रंग दिले जात असले तरी सगळ्यांच्या रक्ताचा रंग एकच आहे आणि हाच खऱ्या भारताच्या एकतेचा रंग आहे. सामाजिक जाणिवेचा संदेश घेऊन काम करणे आणि कोकणची एकता जपणे हा याद्वारे आभाळमाया ग्रुपचा उद्देश कौतुकास्पद आहे. कोकणची संस्कृती जपणे
हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे कोकण आता वेगळ्या अवस्थेतून जात आहे. आपण आता मुंबईपेक्षा वेगळी जीवनशैली जगत नाही खास करून जिल्ह्यातील शहरांमधून कोकण लुप्त झालेले आहे. जिल्ह्यातील तरुण शिक्षण पूर्ण झालं कीं किड्या मुंगी सारख जीवन जगण्यासाठी मुंबई कडे धाव घेत आहे, कारण मुळात आपली शिक्षण व्यवस्थाच आपल्या ग्रामीण कोकणी जीवन शैलीला महत्व कमी करणारी आहे ही गोष्ट फार वेदनादायी आहे. शिस्तीत निसर्गाच्या सानिध्यात राहणं हेच खरे निसर्गाचे संस्कार आहेत. आपली पारंपरिक जीवनशैली जर टिकून राहिली तर हे कोकण राहणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे राहिले ते फक्त कोकण आहे. मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी सह सर्व गावांमध्ये अजूनही कोकणी संस्कृती जपलेली आहे आणि जे खऱ्या अर्थाने हे कोकणी जीवन जगतात तेच खरे सेलिब्रेटी आहेत.” असे प्रतिपादन कोकणी माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसाद गावडे यांनी वराडकर हायस्कुल कट्टा येथे मार्गदर्शन करताना केले.

सहकार महर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ वराडकर हायस्कूल कट्टा येथे आभाळमाया ग्रुप, स्मिता कम्प्युटर कट्टा, व जी. एच. फिटनेस, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ” निसर्ग जीवन शाळा ” या विषयावर मार्गदर्शन करताना कोकणी रान माणूस प्रसाद गावडे यांनी वरील प्रतिपादन केले. या रक्तदान शिबिरात तब्बल २७३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्पूर्वी आभाळमाया ग्रुपच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त जयंत जावडेकर, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे, रानी डगरे आभाळमाया ग्रुपचे प्रमुख सल्लागार तथा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक विजयश्री देसाई, संचालक सुधीर वराडकर, स्मिता कॉम्प्युटरच्या संचालिका श्रद्धा नाईक, कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा राजश्री डगरे, संचालिका मनीषा साळगावकर, नम्रता डीचोलकर, समाजसेवक विजय ( बाळा ) चिंदरकर, जी एच फिटनेसचे संस्थापक गौरव हिर्लेकर, सुप्रसिद्ध युट्युबर मंदार शेट्ये, उद्योजक बिजेंद्र गावडे, डॉ. सोमनाथ परब, कलाशिक्षक समीर चांदरकर, दीपक गोसावी, मुख्याध्यापिका राउळ, माजी मुख्याध्यापक अनिल फणसेकर, कट्टा सरपंच शेखर पेणकर, वराड सरपंच शलाका रावले, उपसरपंच गोपाळ परब, कुणकवळे सरपंच मंदार वराडकर आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, वराड तंटामुक्ती अध्यक्ष छोटू ढोलम, सरमळकर हॉलचे मालक संदीप सरमळकर, हॉटेल व्यावसायिक संजय गावडे, उद्योजक समीर रावले, प्रवीण मिठबावकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, नितीन शेट्ये, मंदार मठकर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच राहुल डगरे आणि पूजा डगरे, गणेश मोरजकर, रामचंद्र आंबेरकर, प्रणित चव्हाण, श्रीकांत चव्हाण, भाई वेंगुर्लेकर, अनिल चव्हाण, दादा रावले, महेश निकम, रूपेश वाडेकर, अमित बिडये, विघ्नेश दळवी, केदार वाडेकर, यांचीही प्रमुख उपस्थिती होती

यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुणे प्रसाद गावडे यांचा शाल श्रीफळ आणि वराड गावातील रोशन मेस्त्री यांनी लाकडामध्ये कोरलेले काष्ठशिल्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी उपस्थितांना दोन डॉक्युमेंटरी दाखवून निसर्ग जीवन शाळा या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले तसेच अनेकांच्या शंका आणि प्रश्न यांनाही अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन ग्रामीण कोकणी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. व आभाळमाया ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान रक्तदान शिबिराबरोबरच रामेश्वर क्लीनिक कट्टा यांच्यातर्फे डॉ. रोहित डगरे यांच्या नेतृत्वाखाली मोफत इ.सी.जी. तपासणी करण्यात आली याचाही अनेकांनी लाभ घेतला. तसेच यावेळी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचाही अनेकांनी लाभ घेतला.
तसेच आभाळमाया ग्रुपच्या वतीने यावेळी ज्येष्ठ भजनी बुवांचाही यथोचित सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबिरात कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे आणि प्रसिद्ध युट्युबर मंदार शेट्ये या दोघांनीही रक्तदान केले. यावेळी आभार मानताना आभाळमाया ग्रुप चे संस्थापक राकेश डगरे यांनी असे प्रतिपादन केले की, “आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबिराला सलग पाचव्या वर्षी २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांचे आभार. कट्टा पंचक्रोशी सारख्या खेडेगावात जिल्ह्यातील सर्वात जास्त रक्तदात्यांची रक्तदान चळवळ उभी करणे हे एक आव्हान होते पण ग्रुपच्या सर्व सदस्यांनी गेली ५ वर्षे मेहनत घेऊन हे सामाजिक कार्याचे यश प्राप्त केले आहे याचे समाधान आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या सर्व सदस्यांना हितचिंतकांचे आभार.”
आभाळमाया ग्रुपचा हा भव्य दिव्य उपक्रम यशस्वी होण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सर्व सदस्य, स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशनची सर्व टीम, जी. एच. फिटनेस कट्टा चे सदस्य, वराडकर हायस्कूल कट्टाचे शिक्षक, विद्यार्थी, सरमळकर हॉल गुरामवाडीचे संदीप सरमळकर आणि त्यांची टीम या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले तसेच जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर, जिल्हा रुग्णालय ओरोस, एस. एस. पी. एम. हॉस्पिटल पडवे यांचे विशेष सहकार्य लाभले.

error: Content is protected !!