नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सपत्नीक काझी शहाबुद्धीन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
“प्रत्येक मताला महत्त्व आहे. मजबूत लोकशाही घडवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करून आपली जबाबदारी पार पाडावी,” असे केसरकर यांनी सांगितले. त्यांच्या मतदानानंतर सावंतवाडी मतदारसंघात मतदानाला आणखी गती मिळाल्याचे दिसून आले असून, केंद्रांवर मतदारांची उपस्थिती वाढू लागली आहे.












