सावंतवाडीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्या ४ तासांत २५.९२ टक्के मतदान

नगरपरिषद निवडणूक: सकाळपासून शांततेत मतदान, ५०३६ मतदारांनी बजावला हक्क

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळच्या पहिल्या सत्रापूर्वीपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. पहिल्या ४ तासात सुमारे २५.९२ टक्के मतदान झाले आहे. शहरातील २१ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले आहे. साडे अकरा वाजेपर्यंतच्या चार तासात १९४२९ मतदारांपैकी ५०३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून येतो होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

error: Content is protected !!