कासार्डे भोगले- पारकरवाडीत ३ डिसेंबर पासून श्री दत्तजयंती उत्सव

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे भोगले पारकरवाडी संचलीत श्री दत्तात्रय सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे ‘श्री दत्त जयंती उत्सव 2025’ दि. 3 ते 6 डिसेंबर, 2025 या कालावधीत श्री दत्त मंदिर भोगले -पारकरवाडी येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार ३ डिसेंबर रोजी स. 11 वा.घटस्थापना सायंकाळी ७ वा. बुवा श्रीधर मुणगेकर यांचे सुश्राव्य भजन, रात्रो ८ वा. स्थानिक भजने. गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. श्री दत्त कथासार सायं. ६ वा. ‘दत्त जन्मोत्सव’, आरती सायंकाळी ६.३० वा. पालखी प्रदक्षिणा रात्रो ८ वा. पालखी दर्शन व नवस फेडणे रात्रो ८ पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्रौ १० वाजता बुवा संदीप पुजारी (महा महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ नाडन ता. देवगड) व श्री चैतन्य गगनगिरी प्रसादिक भजन मंडळ बुवा श्रीकांत शिरसाठ यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना संपन्न होणार आहे.

शुक्रवार दि. ५ डिसेंबर रात्रौ १० वा. कै. शांताराम खाड्ये प्रचलित दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग प्रस्तुत दशवतारी नाटक संपन्न होणार आहेत. तर शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्रौ १० वा. संतोष पारकर मित्र मंडळ पुरस्कार ‘माझी मायबोली’ राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची मराठमोळा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कासारे भोगले पारकरवाडी संचलित श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!