गुड जॉब ! जेव्हा जिल्हाधिकारी करतात कौतुक

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सायंकाळी कणकवली तहसीलदार कार्यालयात भेट देत नगरपंचायत निवडणूक मतदान चा आढावा घेतला. कणकवलीत अत्यंत शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी पाटील आणि आपल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुनियोजन करून नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. या सुनियोजनाबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांची गुड जॉब म्हणत प्रशंसा केली.

error: Content is protected !!