कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, डामरे (कानडेवाडी) येथे गुरुवार, दि. ४ डिसेंबर, २०२५ रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्री दत्त मूर्ती अभिषेक आणि पाद्य पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता लघुरुद्र हवन पार पडेल. सायंकाळी ५ वाजता सामुदायिक नित्यपाठ वाचन, नामस्मरण सेवा आणि सायं. ६ ते ७ वाजेपर्यंत श्रीदत्त महाराजांच्या जन्म सोहळा व नित्य सांज आरती पार पडेल. सायंकाळी ७ वाजता श्रींचा पालखी आनंद सोहळा आयोजित केला असून, रात्री ८ ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता श्री दत्तभवानी प्रासादिक भजन मंडळ बावशी येथील बुवा उद्धव कांडर यांचे सुश्राव्य भजन होईल.प्रत्येक उत्सवाप्रमाणेच या वर्षीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तजयंतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ मठ डामरे येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन












