आचरेतील शिल्पा गांवकर यांची पुणे पॅकर्स दिव्यांग महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदी निवड

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिव्यांग प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा ३ ते ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत पुणे पॅकर्स, कोल्हापूर टायटन्स, मुंबई रायडर्स हे संघ सहभागी होणार आहेत. पुणे पॅकर्स संघात मालवण तालुक्यातील आचरे गावची सुकन्या शिल्पा गांवकर हि खेळणार असून उपकर्णधार पदाची जबाबदारी तीच्यावर सोपविण्यात आली आहे. शिल्पा यांनी यापूर्वी अनेक दिव्यांग क्रिकेट स्पर्धा मध्ये सहभाग घेतला असून यशस्वी कामगिरी केली आहे. तीच्या या निवडीनंतर आचरा पंचक्रोशीतून तीचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!