खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या सौजन्याने खारेपाटण हायस्कूल येथे घेण्यात आलेली भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २०२५ नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेकरिता जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. तर या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्रीकृष्ण आडेलकर यांनी काटेकोर निरीक्षणाखाली संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पाडली. सहाय्यक पंच म्हणून राजेंद्र तवटे, सुयोग धामापूरकर आणि प्रदीप देसाई यांनी प्रभावीपणे काम पाहिले.

या सर्धेतील खुल्या गटातील विजयी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे, यथार्थ डांगी (प्रथम) सावंतवाडी, रुद्र मोबारकर (द्वितीय) वेंगुर्ला, वरद तवटे (तृतीय) कणकवली, वैभव राऊळ, सावंतवाडी, चेतन भोगटे, कणकवली, अन्वय सापळे, वेंगुर्ला, दुर्वांक मलबारी, वेंगुर्ला, तनिष्का आडेलकर, कणकवली, सौरभ धारगळकर, वेंगुर्ला, पूष्कर केळुसकर, सावंतवाडी या सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच अंडर ११, १४, १७, १९ या वयोगटांतील मुला-मुलींना मेडल व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेस खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी. कांबळे, दिगंबर राऊत, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या खजिनदार सारिका महिंद्रे, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर सहाय्यक शिक्षक किरसिंग पाडवी, संगप्पा गुरव यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण हायस्कूल यांनी उत्तम नियोजन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी कौतुक केले.













