खारेपाटण (प्रतिनिधी) : शेर्पे केंद्रा अंतर्गत शिडवणे कोनेवाडी जि.प.शाळा येथे घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार, समूहगान व समूह नृत्य स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कुरंगावणे खैराटवाडी जि.प. प्राथमिक शाळेने विविध खेळांमध्ये घवघवीत यश संपादन करून पुढील फेरीत प्रवेश मिळविलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कुरंगावणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले आहे.
लहान गटात विजेते ठरलेले या शाळेचे विद्यार्थी पुढील प्रमाणे –
५० मीटर व १०० मीटर धावणे – वेदांती बाबू गोठणकर (प्रथम), लांब उडी – आरुष रवींद्र कुडाळकर व धनश्री शंकर मांडवकर (द्वितीय), ५०/४ रिले – (मुली – प्रथम), कबड्डी मुलगे आणि मुली संघ (प्रथम), समूह गान (प्रथम) तर मोठा गट विजेते पुढील प्रमाणे – १०० मीटर धावणे – अनय संतोष पाष्टये, आर्या सूर्यकांत कुडाळकर (प्रथम), आरोही दीपक भितम (द्वितीय), २०० मीटर धावणे – अनय संतोष पाष्टये, वैष्णवी संतोष गिरी (प्रथम), कार्तिक चंदन चाळके (द्वितीय), लांब उडी – आर्या सूर्यकांत कुडाळकर, सोहम मनोहर कुडाळकर (प्रथम), उंच उडी – तन्मय धनाजी गोसावी (द्वितीय), गोळाफेक – कार्तिक चंदन चाळके, कृणाली कृष्णा वाघरे (प्रथम), कबड्डी मुलगे आणि मुली संघ (प्रथम), १००/४ रिले मुली – मुलगे संघ (प्रथम), समूह गान (प्रथम), समूह नृत्य (द्वितीय).
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बाबला गोसावी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू नारायण गोठणकर, तसेच समिती सदस्य आणि पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीपाद बागडी, क्रीडा शिक्षक राजू गर्जे, शारदा तांदळे, रेखा डीसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या प्रभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.












