फोंडाघाट गडगेसकल येथील दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा ४ डिसेंबरला

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गडगेसकल वाडी मध्ये निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्री पर्वतराजींच्या पार्श्वभूमीवर, उंच टेकडीवर वसलेल्या श्री दत्त मंदिरात, दत्त जयंती निमित्ताने, दत्तजन्मोत्सव सोहळा ४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. प्राचीन काळापासून श्रद्धा आणि अंतरात्म्याची अनुभूती देणाऱ्या या निसर्गरम्य आणि शांत परिसरात, हा सोहळा जागृतपणाचे महत्त्व अधिक विषद करतो. यानिमित्ताने सकाळी पूजाअर्चा, सायंकाळी जन्मोत्सव, स्थानिक भजने, रात्री स्थानिक कलाकारांचे नाटक तसेच तुफान भरणारी जत्रा याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल एनसीसी कॅडेट्सनी व शिक्षकांनी परिसराची दोन दिवस अगोदर स्वच्छता करून वाहवा मिळवली. या सर्व उपक्रमांमध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी होऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे संयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!