खारेपाटण येथे व्यायाम शाळा इमारतीचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने खारेपाटण गावासाठी व्यायाम शाळा इमारत बांधणीसाठी निधी मंजूर झाला नुकत्याच या इमारतीचे भूमिपूजन खारेपाटण रामेश्वर नगर येथे गावचे माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, माजी पं. स. सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, मनाली होणाळे, दक्षता सुतार, खारेपाटण पतसंस्थेचे संचालक संतोष पाटणकर, राजेंद्र वरूणकर, खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, मोहन पगारे, उज्ज्वला चिके, भाजप कार्यकर्ते किशोर माळवदे, शेखर शिंदे, शामशुद्दीन काझी, देवानंद ईसवलकर, शेखर कांबळी तसेच ग्रामस्थ वसीम मुकादम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आलेल्या या व्यायामशाळा इमारती करीता शासनाकडून पहिल्या टप्प्या करीता सुमारे १ लाख रुपये निधी मंजूर झाला असून दुसऱ्या टप्प्यात व्यायाम शाळेसाठी आवश्यक असणारी आधुनिक साधने बसविण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.

error: Content is protected !!