खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावचे रहिवासी असलेले महसूल विभागात तलाठी सजा पोंभुर्ले येथे कोतवाल म्हणून कार्यरत असलेले प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचारी प्रकाश घाडी हे नुकतेच दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल नुकताच त्यांचा पोंभुर्ले ग्रामपंचायत कार्यालय व पोंभुर्ले ग्रामस्थ यांच्या वतीने सेवानिवृत्त सत्कार समारंभ दि. १/१२/२०२५ रोजी ग्रामपंचायत पोंभुर्ले येथे संपन्न झाला.
पोंभुर्ले गावचे कोतवाल प्रकाश घाडी हे ३०/११/२०२५ रोजी आपल्या कर्तव्याची अखेरची पायरी पूर्ण करून वयाच्या साठाव्या वर्षी सेवामुक्त झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सरपंच प्रियंका धावडे यांच्या शुभहस्ते गावचे कोतवाल प्रकाश घाडी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपसरपंच सादिक डोंगरकर, ग्रा. पं. सदस्य उदय बावकर, नितीन तेरवणकर, श्री. फाळके, ॲड. प्रसाद करंदीकर, पोलिस पाटील राखी मोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष किशोर कांबळे, माजी अध्यक्ष अशोक पाडावे, सहकारी सोसायटीचे चेअरमन जलाल डोंगरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“कोतवाल ही नोकरी नसून ती गावच्या मातीशी व लोकांच्या सुख दुःखाची जोडलेली एक जबाबदारी असते. ही जबाबदारी प्रकाश घाडी यांनी कोतवाल म्हणून अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून त्यांनी पार पाडली.” असे भावपूर्ण उदगार पोंभुर्ले सरपंच प्रियंका घाडी यांनी सत्कार संभारभात मार्गदर्शन करताना काढले. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थानी कोतवाल प्रकाश घाडी यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील सेवानिवृत्त आयुष्यासाठी शुभेचा दिल्या.













