मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मा. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल येथे पत्रकारांशी थेट संवाद साधणार आहेत.
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता आहे. आरक्षण, मतदार याद्या, निवडणूक कार्यक्रम, आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्पे यासंदर्भात आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.












