कुडाळ (प्रतिनिधी): सत्यपाल मलिक आणि संजय राऊत तसेच पाकिस्तान यांची भाषा एक सारखी आहे. त्यामुळे सत्यपाल मलिक यांचे पार्सल मुंबईत आणण्यापेक्षा संजय राऊत यांनी त्यांच्या समवेत पाकिस्तानात जावे. तेथे जावून शिरकुर्मा खावा, अशी टीका या दोघांच्या भेटीवर भाजप आ नितेश राणे यांनी केली आहे. यावेळी पुढे बोलताना आ राणे यांनी, सत्यपाल आणि राऊत हे दोघे पाकिस्तानचे एजंट आहेत. ते दोघे दिल्लीमध्ये भेटले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावा. यांच्या भेटीत भारता विरुद्ध काय शिजले आहे ? याचा तपास करावा, अशी मागणी केली. तसेच दोघांची नॉर्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी भारतावर केलेल्या टिकेनंतर पाकिस्तानने भारतावर तिखट टीका केली आहे. त्यामुळे सत्यपाल यांचे पार्सल मुंबईत आणण्यापेक्षा राऊत यांनी त्यांच्या समवेत पाकिस्तानात जावे. तेथे शिरखुर्मा खावा, असे सांगितले.तसेच सत्यपाल मलीक यांना मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा देतानाच आ राणे यांनी दिला. चेकवरील शून्य वाढविण्यासाठी रिफायनरीला ठाकरे यांचा विरोध चीपी विमानतळ, जैतापूर प्रकल्प अशा सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. मात्र, नंतर गप्प बसले. त्यांचा हा खटाटोप घर चालवण्यासाठी आहे. विरोध करायचा आणि मिठाई मिळवायची. मिठाई घरात पोहोचल्यावर उद्घाटन आपण करायचे, असा त्यांचा धंदा असून रिफायनरीला विरोध करून चेकवरील शून्य त्यांना वाढवायचा आहे, असा आरोप आ नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. यावेळी आ वैभव नाईक यांना कामाचा ठेका मिळाल्यावर त्यांचाही विरोध मावळेल, असे सांगितले.
सत्यपाल मलिक आणि संजय राऊत तसेच पाकिस्तान यांची भाषा एक सारखी-आ नितेश राणे












