मुंबईसह राज्यात भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन

मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यात महानगरपालिका निवडणूकीत भाजपाने न भूतो असा ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा विजय भाजपाने साध्य केला. या ऐतिहासिक विजयाबद्दल मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास भेट घेऊन विशेष अभिनंदन केले. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते.

error: Content is protected !!