शीतल दळवी – परब याना कळसुली जि प मधून भाजपाकडून उमेदवारी

उद्या दाखल करणार नामनिर्देशन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीच्या शीतल अमित दळवी-परब यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक होते.मात्र कळसुली गावच्या रहिवासी असलेल्या भाजपा कार्यकर्त्या शीतल दळवी-परब यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब करत शीतल याना एबी फॉर्म देण्यात आला आहे. उद्या 21 जानेवारी रोजी शीतल दळवी-परब आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

error: Content is protected !!