देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना सुधीर नकाशे, साची कोलते, सिद्धेश दिलीप रावराणे, मंगेश लोके पं स. उमेदवार
वैभववाडी तालुक्यात भाजपाचे उमेदवार जाहीर
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघातील भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. हे सर्व उमेदवार बुधवारी एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
कोळपे जिल्हा परिषद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक रावराणे, लोरे जिल्हा परिषद रिद्धी रितेश सुतार, तर कोकिसरे जिल्हा परिषदेत श्रावणी रोहन रावराणे यांना भाजपा पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहिर झाली आहे.तर सहा पंचायत समिती पैकी भुईबावडा पंचायत समिती देवानंद पालांडे, कोळपे पंचायत समिती माजी सभापती सुवर्णा महेश संसारे, उंबर्डे पंचायत समिती साची सचिन कोलते, कोकिसरे साधना सुधीर नकाशे, खांबळे पंचायत मंगेश तुकाराम लोके, लोरे पंचायत समिती सिद्देश दिलिप रावराणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भापकडून उमेदवारी लढवण्यास अनेक दिग्गज उमेदवार इच्छुक होते. त्यामुळे भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या नावाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मंगळवारी अधिकृत उमेदवारांची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली. पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार बुधवारी एकत्र आपले अर्ज दाखल करणार आहेत.












