दगडाने ठेचून शेतकऱ्याचा केला खून

सावंतवाडी (प्रतिनिधी): ओवळीये येथील लवू रामा सावंत या ५५वर्षीय इसमाला डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयत सावंत हे आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रात्री झोपले होते. सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्याने आपल्या भावाला मृतावस्थेत पाहिले. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे पोलीस हवालदार दत्ता देसाई करत आहेत.

error: Content is protected !!