सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : राज्याचे गृह (ग्रामीण) , शालेय शिक्षण, गृहनिर्माण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा ,भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ पंकज भोयर उद्या 19 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती निधीतून सिंधुदुर्ग पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा 19 मार्च रोजी राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते ओरोस येथे सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. या वाहन हस्तांतरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री ( ग्रामीण ) नामदार डॉ पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर 19 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर












