चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तनुश चिंदरकर याने पटकावला राज्यात व्दितीय क्रमांक

आचरा (प्रतिनिधी) : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित प्रज्ञाशोध परीक्षा (G.T. S) 2025-26 चिंदर गावचा सुपुत्र तनुश धोंडू चिंदरकर याने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर भटवाडी येथे इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असलेल्या तनुश याने 100 पैकी 98 (98%) गुण प्राप्त करत महाराष्ट्र राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. तनुश याला शिक्षिका निशिगंधा वझे व मैना कारंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून चिंदर गावाचे नाव त्याने उज्ज्वल केले आहे. तनुष भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सुपुत्र आहे.

error: Content is protected !!