ठाकरे सेनेला गुढीपाडव्याला सिंधुदुर्गात दिला दणका
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ऐन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपाची पक्षप्रवेशाची गुढी उभारली असून जिल्ह्यात ठाकरे सेनेला दणका दिला आहे. देवगड तालुक्यातील पडेल भाजपा मंडल मधील वाडा गावातील ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गुढीपाडव्यादिवशी ओरोस येथे भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला. वाडा गावातील ठाकरे सेनेचे शिवसैनिक सुहास वाडेकर, शशांक तावडे, स्नेहल मेस्त्री, सत्यवान मेस्त्री ,रघुनाथ वाडेकर, राजेंद्र वाडेकर, निमेश परब, सतीश परब, सर्वेश परब, संतोष वाडेकर, राजेंद्र वाडेकर, सुशांत पांचाळ, संतोष मेस्त्री, हेमंत पांचाळ, शरद मेस्त्री, विजय पांचाळ आदींनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, पडेल सरपंच भुषण पोकळे, अविनाश सहस्त्रबुद्धे, आशिष जाधव व पदाधिकारी उपस्थितीत होते.












