मोटरसायकल अपघातात एक ठार एक जखमी

मुंबई गोवा महामार्गावर जानवली बौद्धवाडी येथे अपघात

अपघाती मृत्यू होऊनही हायवे टॅब पोलीस सुशेगाद

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली हुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष, मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि. दमोह, राज्य मध्यप्रदेश, सध्या गोवळ देवगड) याचा मृत्यू झाला. हा अपघात १८ मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जाणवली बौद्धवाडी येथे महामार्गावर घडला. अपघातात मोटरसायकल चालक ठार होऊन सुद्धा नॅशनल हायवे टॅबच्या अधिकारी किंवा पोलीस अमंलदारानी या अपघाताची दखल घेत घटना स्थळी जाण्याचे सौजन्य दाखवले नाही. अपघातानंतर तातडीने कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात स्थळी दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पडळकर, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल ठोंमरे, झोरे आदींनी वाहतूक सुरळीत केली. या अपघाताप्रकरणी मयतावर दुचाकी चालक याने बेजाबाबदारपणे अति वेगाने वाहन चालून मृत्यूस कारणीभूत व मागे बसलेल्याला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसात अर्जुन खोदू सिंग गौंड (वय 33) यांनी दिलेल्या काही फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात मागे बसलेला रवी हिरा गौंड वय 25 हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार सायकल MH 01 D 9286 ही घेऊन अनिल सिंग गौंड व त्याच्या मागे बसलेला रवी हिरा गौंड हा कणकवली ते देवगडच्या दिशेने जात असताना रात्री 9 वाजता जाणवली येथे महामार्गावर दुचाकी आली. असताना भरधाव वेगाने असलेली दुचाकी रस्त्याच्या डिव्हायडर वर जाऊन आदळली. यात अनिल सिंग गौड यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे जमलेल्या ग्रामस्थांनी जखमीला उपचारासाठी दाखल केले. कणकवली पोलिसांनी तेथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम केले.

error: Content is protected !!