जि.प.सदस्य श्रावणी रावराणे यांनी वृक्षारोपण करत दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश
वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व वृक्षारोपण जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रोहन रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अंकित काशीद, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी. एस., तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन वृक्षसंवर्धनाची प्रेरणा मिळाली.











