चिंदर गावडेवाडी येथे हनुमान मंदिर जिर्णोद्धार सोहळा..!

३० मार्च ते २ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील हनुमान मंदीराचा जिर्णोद्धार सोहळा सोमवार ३० मार्च ते २ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्या निमित्त सोमवार ३० मार्च रोजी सकाळी कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व होम हवन. दुपारी १ ते ३ महाप्रसाद. दुपारी ३ ते ४ हळदीकुंकू समारंभ. संध्याकाळी ६.३० ते ७.३० भजन- बुवा. तुषार परब (गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ). रात्रौ. ७.३० ते ८.३० भजन- बुवा आकाश मेस्त्री (श्री गणेश पारंपरिक भजन मंडळ, त्रिंबक). रात्रौ. ८.३० ते ९.३० भजन – बुवा. ओमकार साटम( ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ चिंदर साटमवाडी). रात्रौ ९.३० ते १०.३० भजन – बुवा राजन प्रभू (श्री देव मसेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुणगे, आपईवाडी).
मंगळवार-३१ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० वाजता – भजन- बुवा.रमेश मेस्त्री बांदिवडे. रात्री ९.३० पावणाई देवी समई नृत्य किंजवडे-देवगड, यांचा ‘समई नृत्याचा’ बहारदार कार्यक्रम. बुधवार १ एप्रिल रोजी रात्री ८ ते ९ महाप्रसाद, रात्री ९ वाजता जि. प. शाळा चिंदर भटवाडी मधील विद्यार्थ्याचा ‘श्री रामरक्षा’ पठणाचा कार्यक्रम ( मराठी – संस्कृत मध्ये). गुरुवार २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवा निमित्त सकाळी सकाळी ५.३० वाजता ह.भ.प.श्री विनोद सातार्डेकर बुवा वायरी यांचे किर्तन. दुपारी २.३० ते ४.३० वाजता सत्यनारायण महापूजा. सायंकाळी ७.३० ते ९.३० गायक- संदेश रावले यांचा करावोके गायनाचा कार्यक्रम. रात्रौ ९.३० वाजता, विठ्ठल रखुमाई दिंडी मंडळ आचरा देऊळवाडी यांचा ‘नृत्य दिंडीचा’ बहारदार कार्यक्रम – बुवा – लवू घाडी असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ चिंदर गावडेवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!