स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली बस स्थानकावर स्वच्छता मोहीम

स्वच्छता राखण्याचे नगराध्यक्षांचे प्रवाशांना आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : ऑटो रिक्षा चालक- मालक संघटना स्टॅन्ड क्रमांक ३ आणि स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने कणकवली बस स्थानकावर स्वच्छतेचा एल्गार करण्यात आला. संपूर्ण बस स्थानक परिसर चकाचक करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये उपस्थित राहून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बस स्थानकातील प्रवासी आणि नागरिकांना प्रत्यक्ष भेटून स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ समाजसेवक अशोक करंबळेकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेश राजाध्यक्ष, डिस्ट्रीब्यूटर संघटना जिल्हाध्यक्ष भूषण वाडेकर, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश बाळा आमडोस्कर ,रिक्षा स्टॅन्ड क्रमांक तीन चे अध्यक्ष उमेश जावडेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, पत्रकार संघाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत भावे, नायब तहसीलदार दिलीप पाटील एसटीचे अधिकारी श्रीनिवास कदम व इतर मान्यवर उपस्थित होते
सुरुवातीला स्वच्छता मिशनचे प्रमुख स्वच्छता प्रेमी पत्रकार गणेश जेठे यांनी ही मोहीम राबवण्यामागचा उद्देश सांगितला. त्यानंतर स्वच्छतेचा निश्चय सांगितला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या भाषणामध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. अशोक करंबळेकर यांनीही अशा स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

राष्ट्रगीत गाऊन प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला नगराध्यक्ष संदेश पारकर व इतर स्वच्छता प्रेमी व पाहुण्यांनी बस स्थानक वरील सर्व प्रवाशांना प्रत्यक्ष भेटून स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. एसटी बस मध्ये चढून प्रवाशांना कचरा बाहेर न फेकण्याची विनंती केली. एवढेच नव्हे तर स्थानक परिसरात जी दुकाने होती, त्या दुकानदारांनाही कचरा परिसरात टाकू नका असे आवाहन केले.त्यानंतर सर्व स्वच्छता प्रेमींनी परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. बघता बघता काही वेळात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. स्टॅन्ड परिसर स्वच्छ झाल्यानंतर स्टँड समोरील जो पूल आहे त्या पुलाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पुलाच्या बाजूला असलेल्या दुकानदारा नाही स्वच्छते विषयी पत्रक वाटून स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेमध्ये कणकवली माजी सभापती प्रकाश सावंत, दादा भोगले, विनायक मेस्त्री, निवृत्त अधिकारी मेस्त्री पत्रकार नितीन कदम, अजित सावंत, प्रदीप फोपे, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर ,आनंद परब ,विजय जामदार, रोहित मोंडकर ,पत्रकार सचिन राणे, गुरुप्रसाद सावंत, उत्तम सावंत, संजय पेटकर,सुधीर राणे, सत्यवान साटम, नम्रता कुडाळकर, दर्शन सावंत ,सुधीर जोशी,अमोल बोंद्रे वैभव नानचे, गणपत घाडीगावकर सूर्यकांत राणे, सागर मेस्त्री व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!