खारेपाटण रवळनाथ मंदिर गुरववाडी पायवाट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग वार्षिक नियोजनातून तथा २५/१५ सेस फंडातून मंजूर झालेल्या खारेपाटण येथील श्री देव रवळनाथ मंदिर गुरववाडी ते डॉ.शंकर राणे यांचे घरापर्यंत जाणारी पायवाट रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

या पायवाट रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी जि.प. सदस्य प्राची ईसवलकर, पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, मनाली होणाळे, शितीजा धुमाळे प्रणय गुरसाळे, सागर पोमेडकर, सुहास राऊत, अनिकेत गुरव, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

खारेपाटण रवळनाथ मंदिर गुरववाडी ग्रामस्थांची गेली बरीच वाडीतील रस्ता पायवाटेची मागणी करण्यात येत होती. जि.प. प्रशासनाच्या २५/१५ योजनेतून हा रस्ता पायवाट काँक्रीटीकरण करण्याचे काम घेण्यात आले असून याकरिता सुमारे ५ लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या कला निधी प्राप्त करून दिल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!