खारेपाटण संभाजीनगर वरची गुरववाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजीनगर येथील वरची गुरववाडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण करणे कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते व खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आला. या कार्यक्रमाला पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, ग्रा पं.सदस्य जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे,किरणं कर्ले, मनाली होणाळे, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, भाजप महिला कार्यकर्त्या उज्वला चिके, प्रणय गुरसाळे, श्रीधर गुरव, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर,सागर पोमेडकर तसेचं स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना व नागरी जन सुविधा. योजनेतून सुमारे ७ लाख रुपये या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला असून सदर रस्त्याचे पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी सांगितले. तर या रस्त्याचे काम पाठपुरावा करून मंजूर केल्याबद्दल सरपंच महेंद्र गुरव यांचे व सदर रस्त्याला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे स्थानिक ग्रामस्थानी आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!