कणकवली (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, ओसरगांव-बोर्डवे (ता. कणकवली) विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या सर्व १३ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये गणेश दिपक शिंदे याने ७४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. स्वानंदी सुनिल कदम हिने ७४.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर सृष्टी महेश सावंत हिने ७०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मालणकर, संस्था सचिव आशिष परब, सर्व विश्वस्त, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












