खारेपाटण येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची प्रांत अधिकारी यांच्याकडून पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात शनिवार ९ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळा मुळे नागरिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी आज रविवार दि. १० मे रोजी कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रत्यक्ष खारेपाटणला जाऊन केली.व वादळाने नुकसान झालेल्या नागरिकाच्या नुकसानीची तातडीने पंचायदी करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कणकवली सभापती हर्षदा वाळके,उपसभापती श्री सोनू सावंत,खारेपाटण जि.प.सदस्या प्राची ईसवलकर, पं.स सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रामकांत राऊत,सहाय्यक गट विकास अधिकारी श्री वालावलकर खारेपाटण मंडळ अधिकारी श्रीम.बोवलेकर,खारेपाटण ग्रा.पं. ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर,तलाठी प्रवीण लुबडे,पोलिस पाटील अनिकेत जामसंडेकर,अनिकेत चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण मध्ये झालेल्या वादळी नुकसानीची पाहणी महसूल कर्मचारी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन केली. यामध्ये अनेक नागरिकांची घरांवरची कौले उडून गेली तर काहीचे पत्रे उडून जाऊन नुकसान झाले.याबरोबरच अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले असून वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर पडलेल्या आहेत.गेली दोन खारेपाटण मध्ये वीज पुरवठा बंद असून सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने कर्मचारी वर्गाकडून युद्ध पातळीवर वीज वाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू असून मोडलेले वीज खांब आणि तुटलेल्या वीज वाहिन्या जोडणे हे वीज महामंडळा समोर मोठे आव्हान आहे.

error: Content is protected !!