वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील करूळ-जामदारवाडी येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या स्वरा सुर्वे, तन्वी माळकर आणि ऋतिका पाटील या तिघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व आपण कुटुंबियांच्या दुःखात तुमच्यासोबत आहोत असा धीर दिला. यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, बाबा मोरे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, तालुका सचिव गुलझार काझी, युवासेना तरळे शहरप्रमुख आदित्य महाडिक, जितू तळेकर, संदीप कोलते आदी शिवसैनिक उपस्थित होते.
धरणात बुडून मृत झालेल्या मुलींच्या कुटुंबियांचे सुशांत नाईकांनी केले सांत्वन










