कोल्हापूर (प्रतिनिधी) : गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगांवर, माजी आमदार संपतबापू पवार आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कसबा बावडा येथे पार पडला. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेला आहे. शेती नसेल तर शेतकऱ्याची अवस्था बिकट होईल. या निर्णायक लढाईत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या गरज नसलेल्या शक्तीपीठ विरोधात येत्या ९ जूनला भव्य मोर्चा दसरा चौकातून निघेल असे जाहीर केले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे, ए.वाय. पाटील, शिवसेनेचे विजयराव देवणे, रविकिरण इंगवले सुनिल शिंत्रे, उदय नारकर, कॉ. संपत देसाई, शिवाजीराव मगदूम. सम्राट मोरे, अजित पवार, विक्रांत पाटील- किणीकर केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, वसंतराव पाटील, गोपाळराव पाटील, सत्यजीत जाधव, राहुल देसाई, सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील- कौलवकर, आर. वाय. पाटील, कृष्णराव पाटील, पी. डी. धुंदरे, विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, हिंदुराव चौगले, शामराव देसाई, मनोज फरकटे, रणधीर मोरे, उदयराव पाटील, किशोर पाटील, सचिन विश्वास पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह कोल्हापूर जिल्हाभऱातील अनेक शेतकरी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.












