पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळखुर्द दळवीवाडी रस्त्याला 10 लाखांचा निधी

जि प सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील हरकुळ खुर्द थडा ते दळवीवाडी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण नूतनीकरण साठी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला असून या रस्ता कामाचा शुभारंभ हरकुळ जि प सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हरकुळ खुर्द सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी,माजी सरपंच सुभाष दळवी, माजी सरपंच महेंद्र डिचवलकर, माजी उपसरपंच संजय रावले, संदीप रासम, पांडुरंग रासम, दीपक रासम, श्रीकांत दळवी, बंड्या रासम, रुपेश कुबल, रोहित घाग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. हरकुळ खुर्द थडा ते दळवीवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि नूतनीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांची होती. याबाबत हरकुळ खुर्द सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी यांनी जि प सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जि प सदस्य मनोज रावराणे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सदर रस्त्यासाठी विकासनिधी देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण साठी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. येत्या पावसाळ्याआधी रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!