ओसरगाव ग्रा पं च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीची परीक्षा हा भावी सुखकर आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर घडवा. जगात आपले अस्तित्व निर्माण करून स्वतःस गावाची ओळखही निर्माण करा असे आवाहन सरपंच सुप्रिया कदम यांनी ओसरगाव गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना केले. ओसरगाव ग्रामपंचायत च्या वतीने ओसरगाव मधील दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सरपंच कदम बोलत होत्या. गावातील दहावी, बारावी परीक्षेत सुयश मिळविलेल्या एकूण 28 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रोख रक्कम 500 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सरपंच सुप्रिया कदम यांच्यासह
उपसरपंच गुरुदास सावंत, ग्रामपंचायत अधिकारी युवराज बोराडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रदीप तळेकर,
पोलिस पाटील संजना आंगणे, तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित हो

error: Content is protected !!