खारेपाटण महाविद्यालयाचा बी.कॉम.शाखेचा निकाल ९६.२९ टक्के

कु.झुल्फा गफार काझी ९.०५ सी जी पी ए गुण मिळवून प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बी.कॉम. परीक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहीर केला असून महाविद्यालयाने ९६.२९ टक्के इतका उल्लेखनीय निकाल प्राप्त केला आहे. तर कु. झुल्फा गफार काझी या विद्यार्थिनीने ९.०५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. खारेपाटण महाविद्यालयाचा कॉमर्स शाखेचा जाहीर झालेला निकाला नुसार गुणवंत झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे कु.जुल्फा गफ्फार काझी हिने ९.०५ सीजीपीए मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कु.फिरदौस मोहम्मदअली काजी हिने ९.०० सीजीपीए मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला तसेच अनिकेत दशरथ जाधव याने ८.७० सीजीपीए संपादन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. मोहम्मदअली मुन्शी, परीक्षा व मूल्यमापन विभागप्रमुख प्रा. प्रणय माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कु.जुल्फा गफ्फार काझी (Zulfa Gaffar Kazi)

कु.फिरदौस मोहम्मदअली काजी (Firdos Mohammad Kazi)

अनिकेत दशरथ जाधव (Aniket Dasharath Jadhav)

error: Content is protected !!