खारेपाटण महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ८४.६१ टक्के निकाल

रसायनशास्त्र विभागाचा अविनाश खांडेकर ७५.८६ टक्के गुण मिळवून प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया च्या सन – २०२५ -२६ या तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ८४.६१ टक्के एवढा निकाल लागला आहे. तर रसायनशास्त्र विभागाचा विद्यार्थी अविनाश लक्ष्मण खांडेकर याने ७५.८६ टक्के गुण मिळवून विज्ञान विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या या उत्कृष्ट निकालबद्दल व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि सर्व प्राध्यापक वर्गाचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व संस्था विश्वस्त तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी अभिनंदन केले आहे. खारेपाटण महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा राज्यशास्त्र विभागाचा निकाल ९० टक्के लागला असून गणित विभागाचा निकाल ६६.६७ टक्के एवढा लागला आहे.

खारेपाटण महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे गुणवंत विद्यार्थीं पुढील प्रमाणे –
रसायनशास्त्र विभाग– प्रथम – कु.अविनाश लक्ष्मण खांडेकर (७५.८६ %), द्वितीय – कु.ऋतुजा महावीर उपाध्ये
(७५.४३%),तृतीय – आराध्य अजय खांडेकर (६७.००%) तर गणित विभाग – प्रथम – कु.रिया विलास चव्हाण (७०.१४%),द्वितीय – राजेंद्र मोहन नामे (६८.५७%) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खारेपाटण महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!