मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दुष्ट्या विकसित मालवण तालुक्यातील काना कोपऱ्यातून आपल्या सरकारी कोणतेही काम असो मालवण तहसीलदार कार्यालयात ये जा करत असतात आणि कोणतेही सरकारी काम असो की सेतू , रेशनिंग, महसूल, समाज कल्याण, जागेची सुनावणी अन्य अशी काम चुकून एखादे प्रामाणिक अधिकारी त्वरित पूर्तता केली तर अन्यथा हेलपाटे घालावे लागत असतात त्यातील एक मालवण तहसीलदार ऑफिस असावे. त्यांच्या मागील एका कोपऱ्यात असलेल्या शौचालय आणि सतत पाणी यामुळे होणारी नागरिक आणि ग्रामस्थ यांची गैरसोय त्वरित करण्यात यावी अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर म्हणाले की, मालवण तहसीदार ऑफिसला लागूनच मालवण पोलिस ठाणे आहे .जे नागरिक सरकारी काम घेऊन येणार वेळ लागला की शौचालय,बाथरुम शोधत विचारत जात असतात अशातच आत जाण्यापूर्वी दरवाजापासून सुर्वात की तुटलेल्या अवस्थेत दरवाजा आहे आत गेल की पाणी नाही पुढे दुर्गंधी मग येणाऱ्या नागरिकांनी कशाप्रकारे आत जाऊन आपले विधी करावे याविवंचनेत नागरिक, पर्यटक, ग्रामस्थ आहेत. बोलता येत नाही सांगता येत नाही अशी अवस्था झाली आहे. तालुक्यांतील कामानिमित येणारे नागरिक, पर्यटक आणि मुंबईहून आलेल्या नागरिक पर्यटकांनी किती सहन करावे याबाबत मालवण तालुक्याचे मान तहसीलदार साहेब यांनी प्रसिद्धीद्वारे जनतेला खुलासा करावा.
तसेच मालवण तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस रिकामी जागा उपलब्ध असून त्याठिकाणी सुलभ सुशोभित शौचालय होऊ शकत परंतु कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी त्या पाणी पुरवठा नसलेल्या घाणेरड्या शौचालयात जाणे कितपत योग्य आहे.बहुतेकांना हे शौचालय माहित नाही त्यामुळे थोडीफार इज्जत वाचत आहे. अशातच त्याठिकाणी पाणी पुरवठा अधून मधून असल तर असेल नाहीतर नाही कोणीही या होणाऱ्या गैरसोई जवळ चांगल्या नजरेने पाहत नाहीत. अन्यथा बरेच महिने दुर्लक्षित असलेल्या या गैरसोई कडे नागरिकांच्या अजून किती अंत पाहत आहेत.
शौचालयाची सुरवातच बाहेरील दरवाजाने होते असे दरवाजे तालुक्याच्या ठिकाणी त्यात पर्यटन स्थळ असताना याकडे आत गेल्यावर आणखी काही त्यात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही.बाजूला लागूनच पोलिस ठाणे त्याबाजूला रॉक गार्डन, सरकारी गेस्ट हाऊस असताना या आमच्या तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी काय करावे याच विवंचनेत तालुक्यातील नागरिकांना पडलेलं आहे.तरी या होणाऱ्या गैरसोई समस्या दूर करण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी ज्यांच्याजवळ हे सर्व अक्त्यारीत येत त्यांनी त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा पुढे काय करावे लागेल हे आत्ताच सांगता येत नाही. असे पत्रकात सुरेश बापर्डेकर यांनी म्हटले आहे.










