घाट पायथा ते दाजीपूर खिंड दरम्यान, सह्याद्रीच्या रानावनात आंबावृक्ष व बिजारोपण करून फोंडाघाट युवाईचा अभिनव उपक्रम !

छत्र. शिवाजी महाराज मित्रमंडळ फोंडाघाट आणि जि. प.सदस्य राजन चिके यांची मोहीम फत्ते !

फोंडाघाट प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे नूतन जि. प. सदस्य राजन चिके यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा – घाट पायथा ते दाजीपूर खिंड या डोंगरात, सह्याद्रीच्या परिसरात,आंबा वृक्ष व बिजारोपण मोहीम यशस्वीरित्या पार पडली. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे आणि डोंगरदऱ्यामध्ये दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे निसर्ग बदलत आहे. वृक्षारोपणाच्या मोहिमेमुळे पर्यावरणप्रति प्रत्येकामध्ये जागृता निर्माण होऊन, निसर्गाचा समतोल साधला जाईल, अशा विश्वासाचे भान राखून फोंडाघाट चे नूतन जि. प. सदस्य राजन चिके यांनी युवाईला एकत्र करू, समाज- पर्यावरण आणि वृक्षारोपणातून स्तुत्य उपक्रम पूर्ण केला. यावेळी वृक्षाचे संगोपन आणि त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

या मोहिमेत स्वतः राजन चिके यांचे सह अमित चव्हाण, रंजन चिके, स्वप्निल सामंत, संतोष हिर्लेकर,समीर सामंत , सिद्धेश पारकर, सागर सामंत,अजित कदम, सहदेव चव्हाण, आनंद चिके, दादा तायशेटे,अना नांचे, जतीन हिरलेकर,जय धुरी, सोहम सावंत, संचित चव्हाण, मीहीर घाडीगावकर आणि युवाई सहभागी झाली होती. पर्यटनाच्या उंबरठ्यावरील फोंडा- घाट हिरवाईने बहरेल आणि पर्यावरण संपन्न होईल असा विश्वास राजन चिके यांनी यावेळी व्यक्त केला…..

error: Content is protected !!