पंतप्रधान मोदींनी भारताला हिंदुराष्ट्र म्हणून ओळख दिली

पंतप्रधान पदाची 12 वर्षे विश्वासाची, विकासाची आणि जनसेवेची

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्ती चा मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा

सिंधुदुर्गात आता रिव्हर्स मायग्रेशन

कणकवली (प्रतिनिधी) : मोदी सरकारची १२ वर्षाची गौरवशाली कारकिर्द पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.मोदी सरकारचा इतिहास हा हिंदूत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आमचे देवा भाऊ चे सरकार कटिबद्ध आहे असे त्यांनी सुरवातीला नमूद केले. मोदी सरकारने या १२ वर्षात विविध क्षेत्रातील जे परिवर्तन झाले यात प्रामुख्याने राम मंदिर आणि ३७० कलम यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. लव्ह जिहाद सारख्या विषयावर हिंदूत्ववादी सरकारने वेळोवेळी कठोर भूमिका घेतली याचा उल्लेख त्यांनी केला.

ज्या देशात गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायची भीती वाटत होती तो २०१४ पुर्वीचा भारत हा तृष्टीकरणाची राजनीती करणारा देश होता त्या देशात आज जय श्रीराम अभिमानाने उच्चारले जाते हा बदल २०१४ नंतर हिंदूत्ववादी सरकारमुळे झाला. हिंदू ची ‘असुरक्षित’ ही भावना नष्ट झाली. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान झाले आणि देशात आमुलाग्र बदल झाले. “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ” या मुद्द्यावर हिंदूत्ववादी सरकार स्थापन झाले हे हिंदू म्हणून आपल्या सर्वांच्या लक्षात राहण्यासारखे आहे.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, संदिप साटम , मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मधुकर देसाई, संजय वेंगुर्लेकर , भाई सावंत, संतोष राऊळ, सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्ण परब अल्पसंख्याक मोर्चा चे निसार शेख उपस्थित होते.

error: Content is protected !!