जि.प.शिक्षण समिती सदस्य श्रावणी रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
वैभववाडी (प्रतिनिधी) : सर्वत्र १५ जून रोजी नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे पी.एम.श्री.दत्त विद्यामंदिर येथे नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जि.प.सिंधुदुर्ग च्या शिक्षण व आरोग्य समिती सदस्य श्रावणी रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्त व गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी जि.प.सिंधुदुर्ग शिक्षण व आरोग्य समिती सदस्य श्रावणी रावराणे, केंद्र प्रमुख रामचंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस साळुंखे,मुख्याध्यापक दिनकर केळकर, रेखा धावले, अहिल्या लांडगे, महेश प्रभावळकर, सेवानिवृत्त शिक्षीका दर्शना सावंत, सुषमा दळवी, समिधा शिंदे, गौतमी कळसुलकर, विश्वास जंगम, सुनील कुंभार, बहुसंख्येने पालक उपस्थित होते.











