अति पर्जन्य दृष्टीमुळे स्वामींच्या मठातील संरक्षक भिंत कोसळली

देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री स्वामी समर्थ मठाची भिंत पावसाच्या तडाख्याने कोसळली आहे चिरेबंद बांधकाम अकस्मात जमीनदोस्त होऊन मठाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीची छोटी बाग ही या कोसळलेल्या भिंतीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहे भिंत पुन्हा बांधणे अत्यावशक आहेच कारण अधिक पाऊस पडला तर मात्र अजून मातीचा भाग वाहून जावू शकतो.

error: Content is protected !!