पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुर्ली प्राथमिक शाळेत वह्या वाटप

जि.प.सदस्य मनोज रावराणे मित्रमंडळाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे मित्र मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, बूथ अध्यक्ष अतुल डऊर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा परब, सखाराम हुंबे, प्रदीप आग्रे, अनिल दळवी, विनायक कुबडे, अरुण पवार, मधुकर परब, पांडुरंग चव्हाण, चंद्रकांत मर्गज, विजय परब, ग्रामसेवक गोसावी, पोलीस पाटील मृणाली चव्हाण, मुख्याध्यापक रेणुका जोशी, इतर ग्रामस्थ, पालक ,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!