पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरंगवणे येथे रक्तदान शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या दि.२३ जून या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात एकूण २५ रक्तदात्यानी रक्तदान करून शिबिराला सहकार्य केले.

कुरंगवणे ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिराला भाजप सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच बाबाला गोसावी,भाजप कणकवली तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र लाड,भाजप विभागीय अध्यक्ष बबलू पवार,ग्रा.पं.सदस्य विशाखा राऊत,रवींद्र पवार, ग्रामपंचायत अधिकारी गिरीश धुमाळे,पोलिस पाटील देवेन गोसावी,तसेच स्थानिक ग्रामस्थ नारायण कदम,दयानंद धालवलकर सचिन कदम,प्रवीण लाड,प्रताप राऊत,हर्षद लाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कट्टर राणे समर्थक व भाजप कार्यकर्ते तसेच कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायत सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी नामदार नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा करून रक्तदानारखा सामाजिक उपक्रम राबवून चांगले कार्य केले आल्याची भावना यावेळी ग्रामस्थानी व्यक्त केली.

error: Content is protected !!