विशाल कामत, महेश कामत याना मातृशोक
26 जून रोजी सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील जेष्ठ व्यापारी तथा प. पू. भालचंद्र महाराज यांचे निस्सीम भक्त रमेश कामत यांच्या पत्नी वैशाली रमेश कामत ( वय वर्षे72 ,रा विद्यानगर कणकवली ) यांचे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 25 जून रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या 26 जून रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. कणकवली शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महेश कामत आणि युवा उद्योगपती विशाल कामत यांच्या त्या मातोश्री होत.तर डॉ नितीन शेट्ये यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चत पती, विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कै. वैशाली कामत यांच्या निधनाने कणकवलीत शोक व्यक्त होत आहे.












